जुने शहरातील कुख्यात आरोपी एक वर्षासाठी स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:35+5:302021-04-10T04:18:35+5:30

अकोला पोलिसांनी केली एमपीडीएअंतर्गत कारवाई अकोला : जुने शहरातील वाशीम बायपास परिसरातील रहिवासी तसेच कुख्यात गुंड स्वप्निल ऊर्फ लाल्या ...

The infamous defendant in the old town lined up for a year | जुने शहरातील कुख्यात आरोपी एक वर्षासाठी स्थानबद्ध

जुने शहरातील कुख्यात आरोपी एक वर्षासाठी स्थानबद्ध

Next

अकोला पोलिसांनी केली एमपीडीएअंतर्गत कारवाई

अकोला : जुने शहरातील वाशीम बायपास परिसरातील रहिवासी तसेच कुख्यात गुंड स्वप्निल ऊर्फ लाल्या अशोक पालकर यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानंतर शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी हा सपाटा सुरू केला आहे.

जुने शहरातील वाशिम बायपास परिसरातील पंचशीलनगर येथील रहिवासी स्वप्निल ऊर्फ लाल्या अशोक पालकर (वय २४) हा कुख्यात गुंड असून पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, विनयभंग करणे, चोरी, जबरी चोरी, दरोडा टाकणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख, मंगेश महल्ले, अनिल खेडकर यांनी केली.

Web Title: The infamous defendant in the old town lined up for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.