किशोर खत्री हत्याकांडातील आरोपी रणजीतसिंह चुंगडेचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:09 PM2019-09-16T12:09:33+5:302019-09-16T16:45:12+5:30
रणजीत सिंग चुंगडे याचा सोमवारी पहाटे अमरावती जिल्हा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अकोला : अकोल्यातील उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी, तसेच राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी रणजीत सिंग चुंगडे याचा सोमवारी पहाटे अमरावती जिल्हा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चुंगडे याच्यावर अकोल्यातील पहिले बॉम्बकांड, टाडाचा विदभार्तील पहिला गुन्हा तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार आणि किशोर खत्री हत्याकांड यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. रणजितसिंह चुंगडे हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, कामगार सेनेचे माजी जिल्हाप्रमुख, इंटकचे नेते त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले आहेत.
अमरावती कारागृहात बंदी असताना रणजीतसिंह चुंगडे आणि अकोट फैल गँगवॉरमधील आरोपील सलाम खान यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादामुळे चुंगडे काही दिवसांपासून तणावात होता. या तनावातच चुंगडेला सोमवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.