जगदंबदेवी संस्थानमध्ये पायदळ दिंडी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:55+5:302021-02-26T04:24:55+5:30
पातूर : शहरात व तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या जगदंबदेवी संस्थानद्वारेे पातूर ते शेगाव पायदळ दिंडीचे आयोजन केले जाते. पायदळ दिंडीची ...
पातूर : शहरात व तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या जगदंबदेवी संस्थानद्वारेे पातूर ते शेगाव पायदळ दिंडीचे आयोजन केले जाते. पायदळ दिंडीची ६० वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवून १७ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी रोजी पायदळ दिंडी सोहळा संपन्न झाला. या दिंडी सोहळ्यात १५० ते २०० भाविकांनी सहभाग घेतला होता. यावेळी कोरोनाविषयी नियमांचे पालन करण्यात आले.
पातूर ते शेगाव पायदळ दिंडीचा वारसा कैलास देवकर यांनी सुरू केला. हा सोहळा सुरू असावा यासाठी श्रीजगदंबदेवी संस्थानचे अध्यक्ष अंबादास देवकर यांच्या मार्गदर्शनात १७ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान पायदळ दिंडी सोहळा संपन्न झाला. दिंडीचे प्रस्थान पातूर येथून होऊन वाडेगाव, बाळापूर, नागझरी, नागझरीमार्गे शेगावला शेवट झाला. दिंडी सोहळ्यात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरप्रमाणे पालन करण्यात आले. या दरम्यान, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. नंदकिशोर राऊत व सपना राऊत यांनी भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश राऊत, रवी देवकर यांनी भाविकांना मास्क, सॅनिटायझर व इतर सेवा दिली. भाविकांना भोजनाची व्यवस्था तपे हनुमान मंदिर बाळापूर येथे पातूर पं.स. गटनेता तथा शिवसेना शहर प्रमुख अजय ढोणे यांनी केली. तसेच अल्पोपहाराची सुविधा प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल पाटील यांनी उपलब्ध केली. या पायदळ दिंडीसाठी दिंडी पोतदार अशोक राऊत, अनिल निमकंडे, महेश देवकर, प्रवीण देवकर, चेतन खोकले, रोशन देवकर, कुनाल मोकळकर अभय देवकर स्वप्निल देवकर यांनी परिश्रम घेतले. (फोटो)