जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळले अर्भक
By सचिन राऊत | Published: February 11, 2024 07:50 PM2024-02-11T19:50:03+5:302024-02-11T19:50:12+5:30
जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रविवारी सकाळी लहान मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांना एक अर्भक असल्याचे दिसून आले.
अकोला : शहरातील रतनलाल प्लाॅट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या आवारातील मैदानात रविवारी अर्भक आढळल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रविवारी सकाळी लहान मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांना एक अर्भक असल्याचे दिसून आले. या चिमुकल्यांनी आरडा ओरड केली असता परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर सिव्हील लाइन्स पाेलिसांना माहीती दिली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात पाठवण्यात आले.
या प्रकरणी सिव्हील लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी घटनास्थळावर शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुळकर्णी, स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शंकर शेळके, सिव्हील लाइन्सचे ठाणेदार व पाेलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत तपासणी केली.