जीएमसीत कोविड रुग्णांना पुन्हा निकृष्ट दर्जाचे जेवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:58+5:302021-04-04T04:18:58+5:30

दोन शब्दही कोणी धड बोलेना जेवणासोबतच येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वागणेही धड नसल्याचे रुग्णांचे मत आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाचे ...

Inferior food again to Kovid patients at GM! | जीएमसीत कोविड रुग्णांना पुन्हा निकृष्ट दर्जाचे जेवण!

जीएमसीत कोविड रुग्णांना पुन्हा निकृष्ट दर्जाचे जेवण!

Next

दोन शब्दही कोणी धड बोलेना

जेवणासोबतच येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वागणेही धड नसल्याचे रुग्णांचे मत आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण आणि चांगली वागणूक मिळाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, मात्र येथे दोन शब्दही कोणी धड बोलत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

बाहेरगावच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ

सर्वोपचार रुग्णालयातील जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याने स्थानिक रुग्ण घरून जेवणाचा डबा बोलावत आहेत, मात्र शहराबाहेरील जे रुग्ण येथे दाखल आहेत त्यांना नाईलाजाने हेच जेवण घ्यावे लागत आहे. ज्येष्ठांना पोळ्या चावणेही कठीण होत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

मी स्वत: कोविड रुग्ण म्हणून सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहे. या ठिकाणी रुग्णांसोबत उद्धटपणे बोलण्यात येत आहे. गृह विलगीकरणाचाही प्रस्ताव मान्य करण्यात येत नाही. जेवण निकृष्ट दर्जाचे असून त्यातील दाळही शिजलेली नसते, तर पोळ्या खाणेही कठीण आहे. अशा वातावरणात रुग्ण बरा होण्या ऐवजी आणखी आजारी होण्याची जास्त भीती आहे.

आशिष सावळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रुग्णसेवक संघटना, अकोला

जीएमसीबद्दल आजपर्यंत फक्त ऐकले होते, आता मात्र प्रत्यक्षात अनुभव घेत आहे. येथील व्यवस्था चांगली आहे, पण स्वच्छता गृहात पाणी नाही. निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णांना उपाशी राहण्याची वेळ. वयस्क लोकांना अर्धवट शिजलेली डाळ, पोळ्याही चावणे कठीण आहेे. अन्नात कस नाही. जेवण चांगले दिल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

- वर्षा धनोकार, सदस्य, अभ्यंगत समिती, जीएमसी

Web Title: Inferior food again to Kovid patients at GM!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.