रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा; सडक्या मक्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:32+5:302021-04-20T04:19:32+5:30

संजय उमक मूर्तिजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन शासनाने पुन्हा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर ...

Inferior grain supply from ration shops; Distribution of street maize | रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा; सडक्या मक्याचे वाटप

रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा; सडक्या मक्याचे वाटप

Next

संजय उमक

मूर्तिजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन शासनाने पुन्हा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने सामान्य लोकांना मदत म्हणून रेशनवर धान्य पुरवठा करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला शासनाकडून अतिशय निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ग्रामीण जनतेला सध्या रेशनवर गहू, तांदूळ व मका दिला जात आहे, त्यात मका अतिशय निकृष्ट असून, कुजलेला, सडलेला व किडलेला असल्याचे दिसून आले.

यासंदर्भात तक्रार करूनही त्याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात सातत्याने निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे त्यांना हे निकृष्ट धान्य घेतल्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडूनच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्यामुळे नागरिकांवर सडके धान्य खाण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुळे आधीच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून रेशन दुकानात विक्रीसाठी आलेल्या गव्हात व मक्यात मोठ्या प्रमाणात खडे, माती व भेसळयुक्त व निकृष्ट दर्जा असल्याचे आढळून आले आहे. किमान रेशनवर मिळणारे धान्यतरी चांगल्या दर्जाचे मिळावे हीच ग्रामीण जनतेची अपेक्षा असून ग्रामीण भागातील रेशन दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याचे लक्षात आले आहे; परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व त्यात प्रचंड महागाई असल्याने ग्रामीण जनता हतबल झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावरच उदरनिर्वाह करीत आहेत. गोरगरीब जनतेसाठी संजीवनी ठरत असलेल्या धान्यातच भेसळ होत असल्याने नागरिकांनी काय खावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सामान्य जनतेची होत असलेली थट्टा थांबवावी, अशी मागणी होत आहे.

फोटो:

नागरिकांना अनेक दिवसांपासून भेसळयुक्त धान्याचे वाटप होत आहे. त्यातही मका व गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा मिळत असल्याने सामान्य नागरिकांनी सडके व कुजके धान्य खावे का, दर्जेदार धान्याचे वाटप नागरिकांना करण्यात यावे.

-शरद गवई, नागरिक खापरवाडा

Web Title: Inferior grain supply from ration shops; Distribution of street maize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.