रेशन दुकानांमध्ये मिळणारे मका निकृष्ट दर्जाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:50+5:302021-03-25T04:18:50+5:30
माहे मार्च महिन्यामध्ये मात्र सरकारने राशन मध्ये कपात करून गहू ऐवजी मका वितरण करण्यात आले.जो मक्का देण्यात आला तो ...
माहे मार्च महिन्यामध्ये मात्र सरकारने राशन मध्ये कपात करून गहू ऐवजी मका वितरण करण्यात आले.जो मक्का देण्यात आला तो निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे नागरिकांना खाण्यायोग्य नाही. पशु सुद्धा हा मका खाणार नाहीत. एवढा निकृष्ट आहे. त्यामुळे त्याने लॉकडाऊन काळात काय खावे, असा प्रश्न पडत आहे. कोरोना मुळे थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. पाणीपट्टी कर न भरल्यामुळे पाणीपुरवठा सुद्धा बंद करण्यात येत आहे आणि दुसरी कडे शासन सामान्य नागरिकाच्या जीवाशी खेळत आहे.
फोटो:
एकीकडे नागरिकांचा हाताला काम नाही. रेशनवर अनेकजण गुजराण करीत आहेत. रेशन दुकानामध्ये निकृष्ट दर्जाचा मका मिळत आहे. या मक्याला जनावरे सुद्धा तोंड लावत नाहीत. रेशन दुकानांमध्ये उत्कृष्ट मका उपलब्ध करून द्यावा.
-प्रभाकर बुटे, पनोरी