लसीकरणाने नपुसकत्व, निपुत्रिक होण्याची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:52+5:302021-05-31T04:14:52+5:30
काय आहेत अफवा नपुसकत्व येणे कोविड लसीकरणासंदर्भात विविध अफवा पसरल्या आहेत. लस घेतल्यानंतर नपुसकत्व येण्याचा धोका संभावतो, अशी अफवा ...
काय आहेत अफवा
नपुसकत्व येणे
कोविड लसीकरणासंदर्भात विविध अफवा पसरल्या आहेत. लस घेतल्यानंतर नपुसकत्व येण्याचा धोका संभावतो, अशी अफवा अनेक भागात पसरली आहे. मात्र, ही केवळ अफवा असून, त्यात कुठलेही तथ्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
फॅमिली प्लॅनिंगसाठी लस धोक्याची
फॅमिली प्लॅनिंग करणाऱ्यांनी सध्यातरी लस घेऊ नये, असाही सल्ला अनेक जण देतात. यासंदर्भात अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. या गैरसमजामुळे लस टाळणे योग्य नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी लसीकरणापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन अफवा आणि मनातील गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.
निपुत्रिकत्व येणे
लसीकरणामुळे निपुत्रिकत्व होणे, ही अफवादेखील मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. मात्र, निपुत्रिकत्त्वाशी लसीकरणाचा काहीही संबंध नसल्याचे तज्ज्ञ म्हणतात. कोविड लस ही अँटिबॉडीज वाढविण्याचे काम करत असल्याने आजारांपासून संरक्षणासाठी ती चांगलीच आहे.
कोविड लसीकरण पूर्णत: सुरक्षित आहे. लसीकरणामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी आहे. लसीकरणामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पात्र असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लस घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला