सोयाबीन, मुगावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:23 AM2021-08-28T04:23:36+5:302021-08-28T04:23:36+5:30

असे करा व्यवस्थापन मोझॅक व क्रिन्कल विषाणूच्या प्रसाराला कारणीभूत मावा, पांढरी माशी व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी एकरी ७ पिवळे व ...

Infestation of soybean, muga sucking insects! | सोयाबीन, मुगावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव!

सोयाबीन, मुगावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव!

Next

असे करा व्यवस्थापन

मोझॅक व क्रिन्कल विषाणूच्या प्रसाराला कारणीभूत मावा, पांढरी माशी व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी एकरी ७ पिवळे व ४ निळे चिकट सापळ्यांना पिकाच्यावर लावा. बहुतांश किडी त्याला चिकटतात.

मावा, पांढरी माशी व फुलकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फिप्रोनिल ५ टक्के, एस.सी. २० मिली किंवा फ्लोनीकामाईड ५० डब्ल्यू.जी. ३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८० टक्के, एस.एल. २.५ मिली किंवा थायोमेथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू.जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास पुन्हा पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशके आलटून-पालटून फवारावे.

मागील काही दिवसांत वातावरणात झालेल्या बदलामुळे सोयाबीन, मूग पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यास पीक वाचविण्यास मदत होऊ शकते.

- डॉ. विनोद खडसे, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंदेकृवि, अकोला

Web Title: Infestation of soybean, muga sucking insects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.