अकाेला बुलडाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:38+5:302021-02-05T06:11:38+5:30
अकाेला : अकाेला तसेच बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. अकाेल्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथे तसचे बुलडाण्याच्या ...
अकाेला : अकाेला तसेच बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. अकाेल्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथे तसचे बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील वानखेड परसिरात मृत पावलेल्या कोंबड्यांच्या बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाला आहे. या पक्ष्यांच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पिंपळगाव चांभारे ता. बार्शिटाकळी येथील सुरेश बाबाराव सुरडकर यांच्या परसातील पोल्ट्री फार्म मधील पाठविण्यात आलेल्या पक्ष्यांचा अहवाल H5N1 पॉझिटिव्ह आल्याचे कळविले आहे. तसेच या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी सुरेश बाबाराव सुरडकर यांचे पोल्ट्री फार्मपासून १० किमी त्रिज्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले तर वानखेड येथील एका शेतकऱ्याच्या २०० कोंबड्या मृत पावल्या होत्या तर परिसरातील अन्य काही व्यक्तींच्याही कोंबड्या मृत पावल्याचे समोर आले होते. परिणामी येथील नमुने हे भाेपाळ येथील हायसिक्युरीटी अॅनिमल डिसीज लेबॉरेटरीला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला दरम्यान हा परिसरही जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.