तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 02:22 PM2019-12-22T14:22:38+5:302019-12-22T14:22:54+5:30
, नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकºयांनी शेताचे सर्वेक्षण करू न उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवेळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हे पीक आता फुलोºयावर आहे. कीटकनाशकांची फवारणी केल्यास नुकसानाची भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडला आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सध्याही जमिनीत ओल असल्याने तुरीचे पीक चांगले आले आहे. सध्या काही ठिकाणी फुलोरा व शेंगा आलेल्या आहेत; परंतु गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असून, रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाºया अळीच्या वाढीस पोषक आहे. या वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकºयांनी शेताचे सर्वेक्षण करू न उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.
ही अळी शेंगांवर अंडी घालते!
शेंगा पोखरणाºया अळीला इंग्रजीत (हेलीकोवर्पा) म्हणतात. या अळीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मी. लांब पोपटी रंगाची असून, पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करू न आतील दाणे पोखरू न खातात.
ढगाळ वातावरण व रात्रीचे थंड हवामान तुरीवरील शेंगा पोखरणाºया अळीच्या वाढीस पोषक असून, नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी घाबरू न न जाता शेताचे दररोज सर्वेक्षण करू न अळी आढळल्यास एकात्मिक व्यवस्थापन करावे. शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी करावी.
-डॉ. डी. बी. उंदिरवाडे,
विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.