उमेश अलोणे यांना इन्फोथ्रस्ट उत्कृष्ट वार्ता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:56 PM2017-12-22T23:56:43+5:302017-12-22T23:57:32+5:30
अकोला : पत्रकार उमेश अलोणे यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी शुक्रवारी मुंबईत गौरविण्यात आले. ‘प्रजा सभा चळवळ’ आणि ‘इन्फोथ्रस्ट मीडिया’च्यावतीने त्यांना २0१७ चा प्रथम क्रमांकाचा ‘इन्फोथ्रस्ट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पत्रकार उमेश अलोणे यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी शुक्रवारी मुंबईत गौरविण्यात आले. ‘प्रजा सभा चळवळ’ आणि ‘इन्फोथ्रस्ट मीडिया’च्यावतीने त्यांना २0१७ चा प्रथम क्रमांकाचा ‘इन्फोथ्रस्ट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडलेल्या समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुंबईचे माहिती अधिकारी अनिल गलगली, ‘प्रजासभा’चे संस्थापक, राजकीय विचारवंत जगदीश माणेक, पत्रकार गोपाल शर्मा, विनोद जगदाळे, रवी तिवारी, मनमोहन भारती, संतोष आंधळे, आनंद श्रीवास्तव व मुंबईसह राज्यातील पत्रकार व पत्रकारितेतील विद्यार्थी उपस्थित होते.
अकोट येथील धीरज कळसाईत या मुलाच्या अनोख्या शौर्याची गाथा सांगणारी बातमी त्यांनी प्रसारित केली होती. या बातमीसाठी मुंबईच्या टीव्ही र्जनालिस्ट असोसिएशनने ‘इन्फोथ्रस्ट पुरस्कार २0१७’ साठी उत्कृष्ट वार्ता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांत उमेश अलोणे यांना प्रथम, चंद्रपूरचे प्रशांत मोहिते यांना द्वितीय आणि हिंगोलीचे कन्हैया अग्रवाल यांना तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय दोघांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. याशिवाय प्रिंट मीडियातील तिघांनाही प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षभरात अनेक वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या बातम्यांमधून सकारात्मक संदेश देणार्या बातम्यांचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुंबईतील ‘प्रजासभा चळवळ’, निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत ‘ग्लोबल चक्र’ या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.