सातबारावर वारसाची नोंद करता येणार घरबसल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 10:20 AM2021-05-23T10:20:32+5:302021-05-23T10:24:44+5:30
Mahabhumi News : महाभूमी या संकेतस्थळ वर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
- अनिल गिऱ्हे
व्याळा (जि. अकोला) : सातबारा वर वारसा ची नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे, कमी करणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नसून नागरिकांना घरबसल्या नोंदणीसाठी अर्ज करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाभूमी या संकेतस्थळ वर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यापूर्वी विभागाने सातबारा डिजिटल उपलब्ध करून देऊन नागरिकांना उपलब्ध करून देऊन राज्यातील काही बँकांशी करार केला आहे. शेतकरी यांना कर्ज घेण्यासाठी बँकांना सातबारा, आठ अ देण्याचे काम नाही तर ते सर्व बँकेतच उपलब्ध होणार आहे. तसेच अनेक कार्यालयांमध्येही सातबारा लिंक जोडण्यात आल्याने शेतकरी यांना सातबारा साठी चकरा मारायचे काम बंद होणार आहे.
अशी होणार प्रक्रिया
मयत व्यक्तीनंतर त्याच्या वारसांची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. हा अर्ज संबंधित गावाच्या तलाठी यांच्याकडे जाईल तलाठी या अर्जाची ऑनलाईन पडताडणी करतील.
वारस नोंद, तक्रार अर्ज ई हक्क प्रणाली हि सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली असून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
- रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प