बीजेएस च्या पुढाकाराने राजनापूर खिनखिनीची पाणीदार गावाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 03:46 PM2021-06-03T15:46:30+5:302021-06-03T15:48:15+5:30

Murtijapur News : नाला खोलीकरण ठरणार शेतकऱ्यांना वरदान

With the initiative of BJS, water conservation works Rajnapur Khinkhini village | बीजेएस च्या पुढाकाराने राजनापूर खिनखिनीची पाणीदार गावाकडे वाटचाल

बीजेएस च्या पुढाकाराने राजनापूर खिनखिनीची पाणीदार गावाकडे वाटचाल

Next

-संजय उमक
मूर्तिजापूर : भारतीय जैन संघटनेच्या वतीने तालूक्यात गतवर्षी पासून विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यातील तालुक्यातील राजनापूर खिनखिनी गावात मोठ्या प्रमाणात होत असलेले नाला रुंदीकरणाचे काम भविष्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या कामी जिल्ह्यात जेसीबी मशीन अविरत काम करीत आहेत. जलसंधारणाच्या कामामुळे या गावची पाणीदार गावाकडे वाटचाल सुरु आहे. 
          भारतीय जैन संघटना  ही एक गैर सरकारी संघटना आहे आपत्ती व्यवस्थापन व इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्ती समयी  सर्वात प्रथम मदतीला धावून जाते. बिजेएस चे संस्थापक शांतीलाल  मु़थ्था यांच्या निस्वार्थ मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतातील सामाजिक जाणिवेतून आपली जबाबदारी पार पाडत असतात. लाॅकडाऊन काळातही सर्व नियमांचे पालन करुन अकोला जिल्ह्यात जलसंधारणाची कामे धडाक्याने सुरू आहेत.  'सुजलाम् सुफलाम्' अकोला प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यात भारतीय जैन संघटने मार्फत ग्राम पंचायत स्तरावर विविध जल संधारणाची कामे करण्याकरीता ग्राम पंचायत जल संधारण मॉडेल अंतर्गत जेसीबी मशीन गावकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.  या माध्यमातून जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ४० ग्राम पंचायत मध्ये शेततळे, नाला खोलीकरण, जल शोषक पाणंद रस्ते, तलावातील गाळ काढणे अशी विविध जल संधारणाची कामे करण्यात आली. उपसलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात नेऊन टाकत असल्याने शेतकऱ्यांचाही जमिनीची पोत राखण्यास मदत झाली. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाखाच्या वर  घनमीटर गाळ आणि मातीचा उपसा करण्यात आला आहे. शेत तळ्याच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्य़ात सगळ्यात मोठे काम मूर्तिजापूर तालुक्यात झालले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यासाठी १० जेसीबी मशीन उपलब्ध असून ८ मशीन अविरत कामात गुंतल्या आहेत. तालुक्यातील किनी फणी येथेही मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत, तर मधापूरी गावात शेततळ्यांची मोठ्याप्रमाणात निर्मिती करण्यात आली असून येथील शेततळे मॅडेल ठरले आहे, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे तळे आता पाण्याने तुडुंब भरले असते. तर तालुक्यात खापरावाडा, माना, मधापुरी, जितापूर(खेडकर), कंझरा, राजनापूर खिनखिनी येथे सुद्धा पालकमंत्री जल शोषण निर्मित पाणंद रस्ते, या सारखी कामे करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे मार्गदर्शनाखाली  उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पं.स. बिडीओ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचे सहकार्य या कामात मिळत आहे.
           सद्यस्थितीत तालुक्यातील पालकमंत्री बच्चु कडु यांनी दत्तक घेतलेल्या राजनापूर खिनखिनी येथे नाला रुंदीकरणाचे काम युध्दस्तरावर सुरु आहे. भारतीय जैन संघटनेच्या तत्त्वानुसार 'मशीन आमची डिझेल तुमचे'  शेतकऱ्यांच्या  शेतावरचे बांध दुरुस्ती नाला दुरुस्ती  हे सर्व कामे  अवघ्या  अर्ध्या खर्चात आतच  झाली असून  शेतकऱ्यांचा  आर्थिक भुर्दंड ५० टक्क्याने टक्क्याने कमी झालाआहे. याच पद्धतीने नाल्याचे खोलीकरण सुरु असून आतापर्यंत ४ किलोमीटर काम पुर्णत्वास गेले आहे. यामुळे भविष्यात पावसाचे पाणी  शेतकऱ्यांच्या शेतामध्ये  शिरणार नसल्याने पिकांचे नुकसानही  होणार नाही व  भूजलपातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेष म्हणजे या नाल्यांच्या मधात कृषी विभागाने सिमेंट बंधारा उभारलेले असल्याने नाल्यातील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग घेता येईल. आठ किलोमीटर नाला रुंदीकरण अपेक्षित आहे. या साठी राजनापुरच्या  सरपंच  प्रगती रुपेश कडू यांनी दोन वर्ष आधी ही जलसंधारणाच्या कामातून गाव पाणीदार केलेले असून या नाल्यावर सुद्धा १०० टक्के बागायत शेती होणार आहे. या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख तथा जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया, व्यवस्थापक नितीन राजवैद्य यांचे सह तालुका अध्यक्ष डॉ. सुजीत बन्नोरे तालुका सचिव निलेश महाजन यांची या कामासाठी मोठी मदत झाली. परंतु पावसाळा तोंडावर असल्याने केवळ १० जुन पर्यंत कामे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

'डिझेल तुमचे मशीन आमची' तत्वावर जलसंधारणाची कामे चालू आहेत. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत ने ग्राम सभेत कामाचा ठराव मंजूर करुन बिजेएसच्या जिल्हाध्यक्षाकडे तशी मागणी करणे आवश्यक आहे. त्या नंतर अशा कामांना सुरुवात करण्यात येते. 
-डॉ. सुजीत बन्नोरे 
तालुका अध्यक्ष, भारतीय जैन संघटना 

गावात जलसंधारणाची कामे करण्यात आल्याने यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल व गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. पालकमंत्री बच्चु कडु व बीजेएस यांच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्याचा मानस आहे. त्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 
-प्रगती रुपेश कडू 
सरपंच, राजनापूर खिनखिनी 

माझ्या शेतात सातत्याने नाल्याच्या पुराचे पाणी शिरुन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे, नाल्याचे २२ फुट खोलीकरण करण्यात आल्याने तो धोका राहिला नाही. या कामामुळे नाल्या काठीच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
-सनी देशमुख 
शेतकरी, राजनापूर खिनखिनी

Web Title: With the initiative of BJS, water conservation works Rajnapur Khinkhini village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.