कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी सहकार विभागाचा पुढाकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:42 PM2020-05-12T17:42:35+5:302020-05-12T17:42:41+5:30
कृषी निविष्ठा विक्रीची सेवा देण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात २५ सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
अकोला : शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचा उपक्रम कृषी विभागाने सुरू केला आहे. याच धर्तीवर सहकार विभागाने ही कृषी निविष्ठा विक्रीची सेवा देण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात २५ सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशात ताळेबंदी घोषित केली आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी सर्वत्र उपाययोजना केल्या जात आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर आल्याने खते, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदीसाठी शेतकरी सेवा केंद्रावर येणार आहेत; परंतु गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बचत गटामार्फत बी-बियाणे, खते, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने सहकार विभागानेदेखील राज्यात प्रत्येक जिल्ह्यात २५ शेती सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच नाबार्डच्या सहकार्याने शेती सेवा केंद्रे चालू केली जाणार आहेत. यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकरी सोसायटी उत्पादक कंपन्या बैठक घेण्याचे ठरले आहे.
दरवर्षी शेतकरी त्यांना लागणारी बी-बियाणे, खते, शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, अवजारे प्रामुख्याने व्यापाºयांकडून खरेदी करतात. बºयाच वेळा शेतकºयांची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सेवा सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत ग्रामीण भागात खते, कीटकनाशके, बियाणे विक्रीची सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना जिल्ह्यातील सक्षम आर्थिक तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या पालकांसोबत बैठक घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.
राज्यात जवळपास २१ हजारावर प्राथमिक पतपुरवठा संस्था सक्षम शासनामार्फत बी-बियाणे, कीटकनाशके, यंत्रसामग्री सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जिल्ह्यात केंद्रे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.