जलसंवर्धनासाठी मनारखेड सरपंचाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:03+5:302021-04-26T04:17:03+5:30
शेळद येथील कोविड सेंटरमधून रुग्णाचे पलायन बाळापूर : तालुक्यातील शेळद येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण देवराव यादव ...
शेळद येथील कोविड सेंटरमधून रुग्णाचे पलायन
बाळापूर : तालुक्यातील शेळद येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण देवराव यादव खंडारे (वय ७०, रा. पारस) यांनी पलायन केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला.
मोरगाव भाकरे कोराेना लसीपासून नागरिक वंचित
गायगाव : आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरण सुरू आहे; परंतु मोरगाव भाकरे येथे लसीअभावी नागरिकांना परत जावे लागत आहे. डॉक्टर नसल्यामुळे लस देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. लसीकरण तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती
बोरगाव वैराळे : येथे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. येथील दुकानदार, व्यावसायिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी गावात लसीकरणाबाबत सरपंच कल्पना वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे, शाळा समिती अध्यक्ष पुरुषोत्तम डोंगरे, शिक्षक संदीप मोरे, योगेश राऊत यांनी पुढाकार घेतला.