‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांचा रक्तदानासाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:13 AM2021-07-03T04:13:29+5:302021-07-03T04:13:29+5:30
लाेकमत माध्यम समूहाचे संस्थापक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्यात काेराेनाच्या संकटात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा झाल्याची बाब लक्षात ...
लाेकमत माध्यम समूहाचे संस्थापक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्यात काेराेनाच्या संकटात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा झाल्याची बाब लक्षात घेता २ जुलै ते १५ जुलैपर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयाेजन करण्यात आले आहे. सामाजिकदृष्ट्या आयाेजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शहरात पहिल्याच दिवशी भरभरुन प्रतिसाद मिळाला. ११ महाराष्ट्रीयन बटालियनच्या राष्ट्रीय छात्र सेना(एनसीसी)च्या विद्यार्थ्यांनी रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतल्याचे पाहावयास मिळाले. बटालियनचे कर्नल संजय पांडे, सुभेदार मेजर अशाेक शर्मा, लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात हिरिरीने सहभाग नाेंदवला. यावेळी २५ विद्यार्थ्यांनी रक्तदान करीत सामाजिक दायित्व निभावले.
कर्नल म्हणाले ही खरी देशसेवा !
अत्यंत शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून अनेक तरुण व युवती देशसेवेत दाखल हाेतात. ‘एनसीसी’ला त्याग,बलिदानाची परंपरा असून रक्तदानाच्या माध्यमातून रुग्णांचे प्राण वाचत असतील तर ही खरी देशसेवा असल्याचे गाैरवोद्गार ११ महाराष्ट्रीयन बटालियनचे कर्नल संजय पांडे यांनी यावेळी काढले.
बटालियनच्या अधिकाऱ्यांनी दिले याेगदान
बटालियनचे सुभेदार जसविंदर सिंग यांनीही रक्तदान केले. यावेळी लेफ्टनंट डाॅ. अनिल तिरकर, ले. श्वेता मेंढे, ले.डाॅ. उज्ज्वला शिरसाट, ले.सुशेंत मेंदे, ले.डाॅ.सुनील बाेरचाटे, सुभेदार जयपाल, प्रा.धनंजय पाथ्रीकर, प्रा.पी.आर. ठाकरे, हवालदार शाम पडांगळे, हवालदार चंदन आदींनी रक्तदान शिबिरात याेगदान दिले.
विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप
रक्तदान शिबिराचे निमित्त साधत रेडक्राॅस साेसायटीच्या वतीने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी रेडक्राॅसचे कार्यकारी सदस्य डाॅ.के.एन.माहेश्वरी, मानद सचिव प्रभजितसिंह बछेर उपस्थित हाेते.
साइ जीवनतर्फे विद्यार्थ्यांची तपासणी
रक्तदानासाठी विद्यार्थ्यांनी चांगलीच गर्दी केली हाेती. यामध्ये विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग हाेता. तत्पूर्वी साइ जीवन रक्तपेढीचे संचालक डाॅ. नंदकुमार गुजलवार यांनी विद्यार्थ्यांची आराेग्य तपासणी केली. यावेळी रक्तपेढीच्या वतीने अनिरुद्ध हिवराळे, सिद्धार्थ कटारे, हरीश नावकार, गाैरव खंडारे यांनी पिशवी संकलनासाठी भरीव मदत केली.