इनरव्हीलने स्वीकारले सात निराधार बालिकांचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:06+5:302021-04-26T04:16:06+5:30
स्थानिक मलकापूर परिसरातील गायत्री बलिकाश्रमातील सात बालिकांच्या वार्षिक पालकत्वाची जबाबदारी घेण्यात येऊन त्यांच्या वार्षिक शिक्षणाचा खर्च बालिकाश्रमास प्रदान करण्यात ...
स्थानिक मलकापूर परिसरातील गायत्री बलिकाश्रमातील सात बालिकांच्या वार्षिक पालकत्वाची जबाबदारी घेण्यात येऊन त्यांच्या वार्षिक शिक्षणाचा खर्च बालिकाश्रमास प्रदान करण्यात आला. तथा उत्कर्ष शिशुगृहातील एक बलिकेचेदेखील दायित्व स्वीकारण्यात आले. उत्कर्ष शिशुगृहात संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रम हा पालकत्व सोहळा संपन्न झाला. यावेळी शिशुगृहाचे अध्यक्ष विजय जानी, दादा पंत, इनरव्हील क्लब ऑफ अकोला डिस्ट्रिक्ट ३०३ च्या अध्यक्षा नीना चीमा उपस्थित होत्या. यावेळी नीना चीमा, सबिना नजमी, श्रद्धा, वैशाली धारिवाल, नरेंद्र मल्ही, उषा अग्रवाल, रमा गर्ग, सौ. शाह, सी.सी. भारती शेंडे आदींनी या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. क्लब आभार क्लब सी.सी. भारती शेंडे यांनी मानले.
फाेटाे
........................................
प्लाझ्मादानासाठी पुढे या : धाेत्रे
अकाेला : काेराेना संकटात रक्तदान व प्लाझ्मा दान करण्यासाठीसुद्धा पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केले. अकोल्यातील सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते संकटाच्या काळात कठीण परिस्थितीमध्ये समाजातील पीडितांना मदत करण्यासाठी पुढे येत आहे आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
...............................