विदेशी ब्रोकोली भाजीचे उत्पादन घेण्याचा अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:18 AM2021-02-12T04:18:15+5:302021-02-12T04:18:15+5:30

येथील प्रगतिशील व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त रामेश्वर सोनटक्के यांनी त्यांच्या शेतात विदेशी हिरव्या ब्रोकोली कोबीचे उत्पादन घेण्याचा यशस्वी ...

An innovative experiment to produce exotic broccoli vegetables | विदेशी ब्रोकोली भाजीचे उत्पादन घेण्याचा अभिनव प्रयोग

विदेशी ब्रोकोली भाजीचे उत्पादन घेण्याचा अभिनव प्रयोग

Next

येथील प्रगतिशील व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त रामेश्वर सोनटक्के यांनी त्यांच्या शेतात विदेशी हिरव्या ब्रोकोली कोबीचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखविला आहे. शेतातील ब्रोकोलीची भाजी अकोला येथील व्यापाऱ्यांना विकून हा भाजीपाला पुणे, मुंबई आदी मुख्य शहरांमध्ये पाठविण्यात येत आहे. ब्रोकोलीचे उत्पादन फक्त चार महिन्यांचे असून, यापासून चांगले उत्पन्न मिळविता येते. या शेतकऱ्यांच्या अभिनव उपक्रमाची दखल घेऊन डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ भाजीपाला संशोधक प्रा. डॉ अरविंद कांबळे, प्रा. डॉ. अभय वाघ, प्रा. डॉ. विजय काळे यांच्यासह डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठचे कार्यकारी परिषद सदस्य गणेश कंडारकर यांनी सोनटक्के यांच्या शेतात भेट देऊन त्यांनी लागवड केलेल्या विविध भाजीपाल्याची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. अधिकाधिक उत्पादन मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच रामेश्वर सोनटक्के यांच्याकडून घेण्यात येत असलेल्या नानाविध भाजीपाल्याच्या अभिनव प्रयोगातून परिसरातील शेतकऱ्यांना दिशा मिळत आहे.

फोटो:

वाडेगाव येथील शेतकरी रामेश्वर सोनटक्के यांना डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधक यांचे नवनवीन प्रयोग करण्यासंदर्भात वेळोवेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभत असते तर सोनटक्के अभिनव उपक्रम हाती घेऊन अधिक प्रमाणात उत्पादन घेऊन इतर शेतकरी बांधवांसमोर आदर्श निर्माण करीत आहेत.

- ----- गणेश कंडारकर

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य

Web Title: An innovative experiment to produce exotic broccoli vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.