पातूर तालुक्यात बार्टीच्या समतादूत यांचा अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:24+5:302020-12-06T04:19:24+5:30
सदर सप्ताहामध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन, मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका भेट स्वरूपात वाटप तसेच भारतीय संविधान आधारित विविध विषयांवर ...
सदर सप्ताहामध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन, मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका भेट स्वरूपात वाटप तसेच भारतीय संविधान आधारित विविध विषयांवर ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रबोधन अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. या उपक्रमातीलच एक भाग म्हणून अकोला जिह्यातील पातूर तालुक्यातील समतादूत समता तायडे यांनी तालुक्यात विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे कार्यक्रम आयोजन केले. त्यामध्ये ऑनलाइन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार (पुणे) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. संविधानातील मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर पवार यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर, यवतमाळ जिल्हा प्रकल्प अधिकारी राहुल कऱ्हाळे, अमरावती जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील विद्यार्थी, ग्रामस्थ,शासकीय, कर्मचारी इत्यादींनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन व तांत्रिक बाबी मुख्य आयोजक समतादूत समता तायडे यांनी तर आभार प्रदर्शन बाळापूर तालुका समतादूत प्रज्ञा खंडारे यांनी केले.