पातूर तालुक्यात बार्टीच्या समतादूतांचा अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:44+5:302020-12-11T04:45:44+5:30
सदर सप्ताहामध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन, मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका भेट स्वरूपात वाटप, भारतीय संविधान आधारित विविध विषयावर ऑनलाइन ...
सदर सप्ताहामध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन, मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका भेट स्वरूपात वाटप, भारतीय संविधान आधारित विविध विषयावर ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रबोधन अशा प्रकारच्या अभिनव उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमातीलच एक भाग म्हणून जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील समतादूत समता तायडे यांनी तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले. ऑनलाइन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार प्रमुख मार्गदर्शक होते. कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर, यवतमाळ जिल्हा प्रकल्प अधिकारी राहुल कऱ्हाळे, अमरावती जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन व तांत्रिक बाबी मुख्य आयोजक समतादूत समता तायडे तर आभार प्रदर्शन बाळापूर तालुका समतादूत प्रज्ञा खंडारे यांनी केले.