अंदुरा येथील ग्रामस्थांचे अभिनव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:13 PM2017-09-20T19:13:51+5:302017-09-20T19:15:46+5:30
अंदुरा (अकोला): येथील ग्रामस्थांनी अभिनव आंदोलन करीत गावातील गटारांना मेणबत्ती लावत ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्राम प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी गावातील गटारांना मेणबत्ती लावत ग्राम प्रशासनाचा निषेध करीत १६ सप्टेंबर रोजी करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

ऐन पावसाळ्याच्या दिवसांत गावातील विद्युत खांबावर पथदिवे नाहीत. रस्त्याालगतच्या नाल्या गाळाने भरल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी, रस्त्याच्या मध्यभागी गटारगंगा झाली आहे. त्या घाण पाण्यामधून विद्यार्थी व ग्रामस्थांना नाइलाजाने यावे-जावे लागत आहे. या ठिकाणी बरेचदा वृद्ध, विद्यार्थी पाय घसरून, दुचाकीस्वार वाहन घसरून पडले आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनसुद्धा त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या शारीरिक आरोग्याचे नुकसान होत आहे. दलित वस्तीमध्ये गटाराच्या समस्येने रौद्र रूप धारण केले आहे. गावामध्ये एकीकडे साथीच्या रोगाचे थैमान पसरले असून, त्यामध्ये ताप, हिवताप, मलेरिया यासारख्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी शेगाव, अकोला या ठिकाणी जाऊन उपचार करीत आहेत. तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे ग्रामस्थांनी शनिवारी गटारांमध्ये मेणबत्ती लावण्याचे अभिनव आंदोलन करून ग्रामपंचायत प्रशासनाला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आतातरी गावातील गटार, पथदिवे व अन्य समस्या दूर होतील, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.