८४ खेडी पाणीपुरवठा योजना जलवाहिनी दुरुस्ती कामाची चौकशी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:42+5:302020-12-24T04:18:42+5:30

अकोला: जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन ...

Inquire about 84 villages water supply scheme water supply repair work! | ८४ खेडी पाणीपुरवठा योजना जलवाहिनी दुरुस्ती कामाची चौकशी करा!

८४ खेडी पाणीपुरवठा योजना जलवाहिनी दुरुस्ती कामाची चौकशी करा!

Next

अकोला: जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आले.

२०१५-१६ या आर्थिक वर्षात ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात आले. त्यामध्ये काम पूर्ण न करता देयक अदा करण्यात आल्याचा आरोप कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत केला. त्यानुषंगाने जलवाहिनी दुरुस्ती कामाची चौकशी करून , समितीच्या पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्यांच्या सूचना घेऊन, जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे, नवीन तलाव व तलाव दुरुस्ती कामांचा आराखडा तयार करून, शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष सावित्री राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समिती सदस्य अप्पू तिडके, संजय अढाऊ, मीरा पाचपोर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणीटंचाई निवारणाचा

कृती आराखडा तयार करा!

जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले.

Web Title: Inquire about 84 villages water supply scheme water supply repair work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.