तूर खरेदी घोळाची चौकशी सुरू

By admin | Published: May 17, 2017 02:20 AM2017-05-17T02:20:38+5:302017-05-17T02:20:38+5:30

नाफेडच्या केंद्रावरील प्रकार : तालुका उपनिबंधकांसह लेखा परीक्षकांचे पथक

Inquire about the purchase of Tire shop | तूर खरेदी घोळाची चौकशी सुरू

तूर खरेदी घोळाची चौकशी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नाफेडच्या बाजार समितीतील केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची तूर मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, दलालांची चौकशी करण्यासाठी सहकार विभागाच्या तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या नेतृत्वातील पथकाला आदेश देण्यात आले आहेत. भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांच्या तक्रारीनुसार ही चौकशी केली जात आहे.
बाजार समितीमध्ये तुरीला पुरेसा भाव नसल्याने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात बाजारात कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या केंद्रात विकण्याचा सपाटाच व्यापारी, दलाल, कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने लावला. संगनमताने हा प्रकार करण्यात आला. या प्रकाराची तक्रार भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली. त्याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिले.
त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्या तुरीचे काय केले, कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीने कोणती कारवाई केली, नाफेडमध्ये तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कोणाला पैसे दिले गेले, याची सखोल तपासणी करण्याचे बजावले. त्यानुसार ही चौकशी तालुका उपनिबंधक फुपाटे यांच्याकडून केली जाणार आहे. फुपाटे यांच्यासह सहकार विभागाचे लेखा परीक्षक वीरेंद्र सपकाळ, तालुका लेखा परीक्षक एस.एन. ढोेले यांचीही पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये मानकर यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघडपणे कमी दराने तुरीची खरेदी करणारे ८८ व्यापारी असल्याचे नमूद केले आहे. त्यांची यादीही तक्रारीसोबत दिली. त्यांच्यावर बाजार समितीने कोणतीच कारवाई केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बाजार समितीमध्ये नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने त्यांच्या बोलावण्यावरून तेथे गेलेले भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी तक्रारीतून केवळ जाब विचारला असताना त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले, याप्रकरणी महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनचे मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांचीही चौकशी होणार आहे.

Web Title: Inquire about the purchase of Tire shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.