‘मंडळ अधिकाऱ्याच्या कामकाजाची चौकशी करा !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:24 AM2021-02-27T04:24:31+5:302021-02-27T04:24:31+5:30

--------------------------------------------- दोनद फाटा- राहीत रस्त्याचे काम निकृष्ट बार्शीटाकळी : तालुक्यात दोनद फाटा ते राहीत या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम ...

‘Inquire about the work of the board officer!’ | ‘मंडळ अधिकाऱ्याच्या कामकाजाची चौकशी करा !’

‘मंडळ अधिकाऱ्याच्या कामकाजाची चौकशी करा !’

Next

---------------------------------------------

दोनद फाटा- राहीत रस्त्याचे काम निकृष्ट

बार्शीटाकळी : तालुक्यात दोनद फाटा ते राहीत या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे; मात्र या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

------------------------

अकोली वेस परिसरात भरला आठवडी बाजार

बार्शीटाकळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला आठवडी बाजार शहरातील अकोली वेस भागात भरला. बाजारात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाले असून, ग्राहक व विक्रेते विनामास्क दिसून आले.

-----------------------------

तेल्हारा शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था

तेल्हारा : शहारातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, शहरवासी त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

-----------------------------

बाळापूर शहरातील हातपंप बंद

बाळापूर : शहरातील हातपंप बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. याकडे न.प.चे दुर्लक्ष होत आहे. शहरातील हातपंप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन हातपंप दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

--------------------------------

अकोट बसस्थानकात घाणीचे साम्राज्य

अकोट : येथील बसस्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवाशांसह चालक-वाहकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे संबंधित विभागाने दखल घेऊन बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

Web Title: ‘Inquire about the work of the board officer!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.