कीटकजन्य आजार काढत आहेत डोकेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:35+5:302021-07-12T04:13:35+5:30
------------------ कचऱ्याचे ढिगारे, घाणीमुळे नागरिक त्रस्त बार्शीटाकळी: शहरात कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेचे वाभाडे निघाले आहेत. नाल्या तुंबलेल्या असून, कचऱ्याचे ...
------------------
कचऱ्याचे ढिगारे, घाणीमुळे नागरिक त्रस्त
बार्शीटाकळी: शहरात कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेचे वाभाडे निघाले आहेत. नाल्या तुंबलेल्या असून, कचऱ्याचे ढिगारेही दिसून येतात. परिणामी, सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे तत्काळ गावात नालेसफाई करण्याची गरज असून, तशी मागणी आहे.
--------------
बसफेरीअभावी प्रवाशांची हेळसांड
खिरपुरी : खिरपुरी-वाडेगाव रात्री शेवटी उशिरा येणाऱ्या एसटी बसफेरी बंद केल्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे. बंद केलेल्या बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी आहे. बस बंद असल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
--------------------
खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
बार्शीटाकळी: शहरातील अंतर्गत रस्त्यांची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.