राज्यात तीन कोटी रुपयांची कीटकनाशके, खते जप्तीची कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:05 PM2019-04-05T16:05:50+5:302019-04-05T16:05:57+5:30
अकोला: परवाना नसताना कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्या, आस्थापनावर कारवाई करू न तीन कोटी रुपये किमतीच्या निविष्ठा जप्त करण्यात आल्या.
अकोला: परवाना नसताना कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्या, आस्थापनावर कारवाई करू न तीन कोटी रुपये किमतीच्या निविष्ठा जप्त करण्यात आल्या. अकोल्यात तीन दिवस अगोदर दोन कोटी रुपये किमतीची विनापरवाना मिश्र खते जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला; पण मागील वर्षी लाखो रुपयांच्या निविष्ठा जप्त करण्यात आल्या. त्यावर पुढे काय ठोस कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषी विभागाने राज्यात भेसळयुक्त व अप्रमाणित निविष्ठा निर्मिती करणाऱ्या कंपन्या व साठा असलेल्या गोदामावर धाडसत्र सुरू केले असून, मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आलेल्या धाडीत तीन कोटी रुपये किमतीची कीटकनाशके, मिश्र खते, निविष्ठा जप्त करण्यात आल्या. गुन्हेही दाखल करण्यात आले. अकोल्यात मार्च महिन्यात २ कोटी १७ लाख रुपयांचे अप्रमाणित, नोंदणी नसलेली मिश्र व विद्राव्य खतांचा साठा आढळून आला. मे. सेवीयो बायो आॅर्गेनिक अॅण्ड फर्टिलायझर प्रा.लि. झुंझवाड, नंदागड ता. खानापूर जि. बेळगाव (कर्नाटक) कंपनीचा हा साठा आहे. साठा आढळल्यानंतर कंपनी संचालकाना कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची वेळ देण्यात आली. तथापि, या सात दिवसांत कंपनीने कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे अकोला कृषी गुणनियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे यांनी १ एप्रिल रोजी अकोल्यात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरू न पोलिसांनी कंपनीच्या औरंगाबाद येथील सूर्यकांत मुंडे विपणन व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने राज्यात तसेच विदर्भात अप्रमाणित, बोगस, कृषी निविष्ठा विक्री व साठा करणाºयाविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, मागील आठवड्यापासून धाडसत्र सुरू केले. अकोल्यात गुण नियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे व मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी ही कारवाई केली. राज्यात कोल्हापूर, नांदेड व लाूतर येथेही अशा पद्धतीचा साठा आढळून आला आहे. पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात अप्रमाणिक कृषी निविष्ठांचा साठा केला जातो. अकोला हे मुख्य केंद्र असून, दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात असा साठा जप्त करण्यात येतो. तथापि, ठोस निष्कर्ष अद्याप तरी निघाले नसल्याचे चित्र आहे.
- अद्ययावत अभिलेख आढळले नसल्याने मे. सेवीयो बायोचे २ कोटी १७ लाख रुपयांची मिश्र खते जप्त करण्यात आली तसेच पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्यात आला.
नितीन लोखंडे,
गुणनियंत्रण अधिकारी, अकोला.