पहिल्याच दिवशी ७७५ दुकानांची तपासणी;४० दुकानांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:24+5:302021-03-06T04:18:24+5:30
जिल्ह्यासह शहरात काेराेनाचा प्रादूर्भाव वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे. यामुळे शासकीय तसेच ...
जिल्ह्यासह शहरात काेराेनाचा प्रादूर्भाव वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे. यामुळे शासकीय तसेच वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. गतवर्षी काेराेनामुळे सर्व उद्याेग व्यवसाय ठप्प झाले हाेते. अनेकांच्या नाेकऱ्या गेल्यामुळे बेराेजगारीचा प्रश्न निर्माण झाला. शासनाने टाळेबंदी शिथील केल्यामुळे पुन्हा एकदा उद्याेग व्यवसाय सुरु झाले. मागील काही दिवसांपासून काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून जिल्हाप्रशासनाने ८ मार्च पर्यंत टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, निर्धारित वेळेत व्यापार सुरु करण्याची मुभा देण्याचा रेटा व्यापाऱ्यांनी लावून धरल्यानंतर जिल्हाप्रशासनाने ५ मार्च पासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली. त्यासाठी व्यापारी व दुकानांमधील कामगारांची काेराेना चाचणी अनिवार्य करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताच मनपा,महसूल व पाेलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाइचा बडगा उगारला. काेराेना चाचणीचा अहवाल नसणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ४० दुकानांना सील लावण्याची कारवाइ करण्यात आली.
अशी केली झाेन निहाय कारवाइ
मनपाने गठीत केलेल्या पथकांनी पूर्व झाेनमध्ये ३५० दुकानांची तपासणी केली. पश्चिम झाेनमध्ये ३० दुकानांची तपासणी करीत दाेन दुकानांना सील लावले. उत्तर झाेनमध्ये २६० दुकानांची तपासणी करून ३५ दुकानांना सील लावण्यात आले. दक्षिण झाेनअंतर्गत १३५ दुकानांची तपासणी करीत तीन दुकानांना सील लावले आहे.