कीटकनाशक, खतांच्या ८६ गोदामांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:23 AM2017-10-10T02:23:57+5:302017-10-10T02:24:54+5:30

अकोला : परराज्यात निर्मिती करून महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी गोदामात साठा केलेल्या कीटकनाशकांसह खते आणि इतरही कृषी निविष्ठांच्या ८६ गोदामांची अधिकार्‍यांच्या आठ पथकांकडून तपासणी आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी ही पथके गठित केली. पथकांच्या अहवालानुसार साठा जप्त, परवान्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. 

Inspection of pesticides, fertilizers, 86 warehouses | कीटकनाशक, खतांच्या ८६ गोदामांची तपासणी

कीटकनाशक, खतांच्या ८६ गोदामांची तपासणी

Next
ठळक मुद्देसाठा जप्तीसह परवान्यांवर होणार कारवाईवितरक, कृषी सेवा केंद्रांचीही होणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : परराज्यात निर्मिती करून महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी गोदामात साठा केलेल्या कीटकनाशकांसह खते आणि इतरही कृषी निविष्ठांच्या ८६ गोदामांची अधिकार्‍यांच्या आठ पथकांकडून तपासणी आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी ही पथके गठित केली. पथकांच्या अहवालानुसार साठा जप्त, परवान्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. 
यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूंच्या संख्येमुळे शासनही हादरले. या प्रकाराची तातडीने चौकशी करण्यासाठी पुणे कृषी आयुक्तालयातील पथक शनिवारीच अकोला जिल्ह्यात दाखल झाले. पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना मोठय़ा प्रमाणात मजूर, शेतकर्‍यांना प्राणास मुकावे लागले. हा प्रकार ज्या कीटकनाशकांमुळे झाला, त्या साठय़ाची तपासणी करण्यासोबतच कालबाह्य जहाल कीटकनाशकांची साठा तपासणी करण्यासाठी आदेश पुणे येथील कृषी आयुक्तालयाने दिले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यात इतर ठिकाणी असलेल्या गोदामांची तपासणी करण्यासाठी पथके गठित केली. त्या पथकांकडून ६६ कीटकनाशक, कृषी निविष्ठा उत्पादक ठिकाणे, २0 रासायनिक खतांच्या गोदामांची तपासणी केली जात आहे. एकूण ८६ ठिकाणची जबाबदारी पथकांना वाटून देण्यात आली आहे. 
त्यामध्ये जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांचे पथक नऊ कीटकनाशक, तीन खतांच्या गोदामांची तपासणी करत आहे. 
जिल्हा गुणवत्ता निरीक्षक मिलिंद जंजाळ यांच्या पथकाकडे २0 कीटकनाशक, सात खतांचे गोदाम आहेत. जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकार्‍यांच्या पथकाकडे १२ कीटकनाशके, पाच खतांचे गोदाम आहेत. 
अकोला पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल बोंडे यांच्याकडे दोन्ही मिळून १७ गोदाम आहेत. अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक यांच्याकडे कीटकनाशकांची दोन गोदामे आहेत. अकोल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी पथकाकडे कीटकनाशकांचे तीन गोदाम, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री यांच्याकडे तीन, तांत्रिक अधिकार्‍यांकडे दोन गोदामांची तपासणी देण्यात आली आहे. 

Web Title: Inspection of pesticides, fertilizers, 86 warehouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.