शेतक-यांचेच प्रक्रिया उद्योग देणार शेतक-यांना प्रेरणा !
By admin | Published: December 8, 2014 01:07 AM2014-12-08T01:07:03+5:302014-12-08T01:07:03+5:30
आंतरराष्ट्रीय शेतक-यांनी दिली प्रक्रिया उद्योग, वनशेतीला भेट.
अकोला: खारपाणपट्टय़ातील शेतकर्यांचा शेती कसण्याचा संर्घष बघितल्यांनतर रविवारी आं तरराष्ट्रीय शेतकरी, तज्ज्ञांनी शेती मालावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि वनशेती बघितली, प्रक्रिया उद्योग बघून हेच अपेक्षित असल्याचे मत, या तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, यापासून शे तकर्यांना प्रेरणा मिळते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात चार दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी पारिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवस जगातील अकरा देशांच्या २७ शे तकरी, तज्ज्ञांनी या भागातील शेती क्षेत्रांना भेटी दिल्या आहेत. रविवारी त्यांनी बोरगाव मंजू ये थील महिला शेतकरी अनिता कौसर यांच्या आवळा आणि हळद शेतीला भेट दिली. या शेतकरी महिलेने या भागात शेतकर्यांसाठी प्रेरणादायी अशी शेती तयार केली असून, उत्पादित मालाचे मूल्य वाढविले आहे. त्यांच्या बागेतील या पिकासह मातृफळ ईडलिंबू, कांदा पीक घेतले जात आहे. त्याच बरोबर प्रक्रिया उद्योग सुरू करू न उत्पादित आवळय़ापासून आवळा कॅन्डी, रस, जेली आदी पदार्थ त्या तयार करतात. त्यांनी या भागातील महिलांनाही या माध्यमातून रोजगार उ पलब्ध करू न दिला आहे. महिला शेतकर्यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी केनियाच्या महिला शेतकरी डोमिनिका वांजीरू , युगांडाच्या जायलिन नपोकोली, खुश्रीदा हमीदोवा, फिरू जा मुस्ताफीना, राहीमोवा झीलोला, शर्मिला गुंजल, जुलीयाना स्वै.,जाचींता वन्जा आदींसह अमेरिका व इतर उपस्थित महिलांनी व्यक्त केले.