प्रेरणादायी अंतराळयात्री सुनीता विल्यम्स डिजिटल शो
By Admin | Published: June 29, 2014 12:37 AM2014-06-29T00:37:14+5:302014-06-29T00:48:39+5:30
लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजन
अकोला : सुनीता विल्यम्स हिने अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय वंशाच्या या अमेरिकन स्त्रीने अंतराळात स्पेसवॉक करून अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. तिचा हा थक्क करून सोडवणारा अवकाश प्रवास बालगोपालांना प्रत्यक्ष बघता यावा या अनुषंगाने लोकमत बाल विकास मंचतर्फे प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रा. विवेक मेहेत्रे प्रस्तुत ह्यप्रेरणादायी अंतराळयात्री सुनीता विल्यम्स डिजिटल शोह्णचे आयोजन रविवार दि. ६ जुलै २0१४ रोजी सकाळी १0.३0 वाजता प्रमिलाताई ओक हॉल येथे करण्यात आले आहे. तरी सर्व बाल विकास मंच सदस्यांनी या अद्भुत डिजिटल शोला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. या कार्यक्रमात प्रा. विवेक मेहेत्रे विद्यार्थ्यांना सुनीता विल्यम्सचे बालपण, अंतराळातील तिचे विक्रम व स्पेस वॉक करताना तिने अवलंबलेले तंत्र याबद्दल पुरेपूर माहिती देणार आहेत. तर मग काय येताय ना तुमचा सच्चा सवंगडी बाल विकास मंचसोबत सुनीता विल्यम्सचा हा अनोखा अंतरिक्ष प्रवास बघायला? कार्यक्रमाला फक्त बाल विकास मंच सदस्यांना प्रवेश असेल. सोबत सदस्यता ओळखपत्र आणणे आवश्यक. अधिक माहितीसाठी बाल विकास मंच संयोजक योगेश पाटील ९९७0४५७७६0 यांच्याशी संपर्क साधावा.