सीसी कॅमेरे बसविण्यासाठी अकोल्यातील दोन्ही आगारांचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:59 PM2017-12-20T14:59:13+5:302017-12-20T15:02:35+5:30
अकोला : महाराष्ट्रातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर सीसी कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासाठी संबंधित कंपनीने आता प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे.
अकोला : महाराष्ट्रातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर सीसी कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासाठी संबंधित कंपनीने आता प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे. अकोला आगार क्रमांक एक आणि दोनवरील क्षेत्रफळ आणि कॅमेरे लावण्याच्या ठिकाणाचे सर्वेक्षण केले. नवीन वर्षाच्या प्रारंभाआधी अकोल्यासह राज्यातील सर्व आगारांवर सीसी कॅमेरे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्रवासी आणि त्यांच्या साहित्याची सुरक्षा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला असून, या प्रणालीवर राज्यात ३६ कोटींचा खर्च होत आहे. मे. आॅरीसन प्रो. सोल्युशन्स लि. कंपनी मुंबईच्या अधिकाºयांनी अकोलाच्या दोन्ही आगाराचा दौरा करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. त्यामुळे लवकरच अकोलाच्या दोन्ही आगारावर कायम सुरक्षेची नजर राहणार आहे. अर्धा किलोमीटर अंतरापर्यंतचे चित्र टिपल्या जाऊ शकेल, एवढी क्षमता या कॅमेºयांमध्ये असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाºयांनी केला आहे. मुंबईपासून घेऊन तर राज्यातील आणि जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व आगारांवर सीसी कॅमेरे लावण्याच्या या निर्णयामुळे अनेक प्रकारावर आळा बसणार आहे. कॅमेरा, केबल्स, एलईडी स्क्रीन आदी कोणत्या ठिकाणी असेल, डाटा स्टोअर रूम कोठे असावी, यासंदर्भात सर्व माहिती टिपून हे अधिकारी अकोल्यातून गेले. कंपनीसोबत पाच वर्षांचा कंत्राट राज्य शासनाने केला असून, त्याची आॅपरेटिंग सिस्टिमची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे.