संस्थाध्यक्ष, सचिवाने केला प्राध्यापिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:21 AM2020-09-23T11:21:07+5:302020-09-23T11:21:35+5:30
संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे, सचिव हरीश बोचरे यांनी कक्षात बोलावून प्राध्यापिकेला धक्काबुक्की करून विनयभंग केला.
पातूर: येथील महात्मा फुले आर्टस अॅण्ड सायन्स कॉलेजमधील एक प्राध्यापिका २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सहकारी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे, सचिव हरीश बोचरे यांनी कक्षात बोलावून एक दिवसाचे वेतन कापल्याबाबत पत्र दिले आणि धक्काबुक्की केली, तसेच प्राध्यापिकेला धक्काबुक्की करून विनयभंग केला. याप्रकरणी पातूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
एका प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे व सचिव हरीश सुभाष बोचरे हे गत चार ते पाच वर्षांपासून नियमित वेतन देत नाहीत. त्यामुळे कुटुंबाची उपासमार होत आहे. संस्थेने जानेवारी ते जुलै २0२0 महिन्यांचे वेतन दिले नाही, त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी २८ आॅगस्ट रोजी एक दिवस संपर्क केला. महाविद्यालयाला वेतनासाठी पत्र दिले. त्यानंतरही वेतन न मिळाल्यामुळे सर्वांनी एक दिवस पुन्हा संप केला. प्राध्यापक व कर्मचाºयांचे कोणतेही बिल मंजूर करण्यासाठी अध्यक्ष, सचिव वारंवार पैशांची मागणी करतात. महिला प्राध्यापकांना कक्षात एकटे बोलावून अपशब्द वापरतात. २२ सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाºयांना अध्यक्ष व सचिवांनी त्यांच्या कक्षात बोलावले आणि एक दिवसाचे वेतन कपात केल्याचे पत्र दिले. याबाबत त्यांना जाब विचारला असता, त्यांनी प्राचार्य वाठ यांच्यासमोर धक्काबुक्की केली, तसेच एका सहायक प्राध्यापिकेलासुद्धा धक्काबुक्की केली आणि धमकी दिली. अध्यक्ष सुभाष बोचरे व सचिव हरीश बोचरे हे नेहमीच प्राध्यापक व कर्मचाºयांचा मानसिक छळ करतात. शिवीगाळ करून धमक्या देतात, त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्राध्यापिकेच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी संस्थाध्यक्ष व सचिवाविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.
प्राध्यापक, कर्मचाºयांच्या तक्रारीची सोमवारी सुनावणी अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांच्याकडे महात्मा फुले कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी तक्रार करून कर्मचाºयांवर झालेल्या अन्यायाची चौकशी करावी आणि महाविद्यालयात कामकाज चालविण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार डॉ. तुपे यांनी प्राचार्यांना पत्र देत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांवर झालेल्या अन्यायाबाबत २८ सप्टेंबर रोजी दुपारी सुनावणी घेण्यास कळविले आहे.