शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 02:29 PM2019-05-31T14:29:30+5:302019-05-31T14:29:36+5:30

शिक्षक, कर्मचाºयाच्या वेतनाची माहिती प्रचलित पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकातील माहितीनुसार भरावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. (

Instructions for inclusion of teachers, non-teaching staff in the system! | शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना!

शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना!

Next

अकोला: शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश करण्यासाठी शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. काही प्रस्तावानुसार शिक्षणसेवक, सहशिक्षक कर्मचाºयांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यास परवानगी देण्यात आली; मात्र अद्यापही अनेक शाळांनी माहिती भरली नसल्यामुळे आॅनलाइन व प्रचलित वेतन देयकांमध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे शाळांना पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीमधून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना अटॅच-डिटॅच समावेश करणे, सर्व्हिस एण्ड करणे आदींबाबत सूचना दिल्या होत्या, तसेच शालार्थ प्रणालीतील कार्य पूर्ण करून फेब्रुवारी २0१९ मधील प्रचलित पद्धतीने तयार केलेले वेतन देयक शालार्थ प्रणालीमध्ये आॅनलाइन पद्धतीने तयार करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या होत्या. शालार्थ प्रणालीतील कार्यवाही १00 टक्के पूर्ण झाली. खात्री करून कर्मचारी सर्व्हिस एण्डच्या संदर्भात केवळ नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छा सेवानिवृत्त, मयत आदी कारणांमुळे सध्या सेवेत नसलेल्या कर्मचाºयांची सर्व्हिस एण्ड करण्यात आली आहे. याची खात्री करावी, तसेच प्रचलित पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकातील नोंदी, शालार्थ प्रणालीमध्ये आॅनलाइन पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकातील नोंदी बरोबर असणे आवश्यक आहेत. ज्या शाळांच्या फेब्रुवारी २0१९ च्या प्रचलित वेतन देयकात व शालार्थ प्रणालीमध्ये आॅनलाइन पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकात तफावत आढळून आली आहे, अशा शाळांच्या वेतन देयकांची माहिती शालार्थवर सादर करावी. शालार्थ प्रणालीमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देयके तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षक, कर्मचाºयाच्या वेतनाची माहिती प्रचलित पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकातील माहितीनुसार भरावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: Instructions for inclusion of teachers, non-teaching staff in the system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.