ईदपूर्वी शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 02:00 PM2019-05-08T14:00:42+5:302019-05-08T14:00:57+5:30

शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी ईद सणापूर्वी म्हणजे १ जूनला शिक्षकांना वेतन अदा करण्याचे आदेश ६ मे रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

 Instructions for paying teachers before Eid | ईदपूर्वी शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे निर्देश

ईदपूर्वी शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे निर्देश

Next

अकोला: राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला करण्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये १ तारखेला वेतन मिळतच नाही. पवित्र रमजान महिना व ईद सण असल्यामुळे शिक्षकांचे वेतन १ जूनलाच अदा करण्याबाबत अ.भा. उर्दू शिक्षक संघटनेने शिक्षण संचालकांकडे मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी ईद सणापूर्वी म्हणजे १ जूनला शिक्षकांना वेतन अदा करण्याचे आदेश ६ मे रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने शिक्षकांची बाजू उचलत, शिक्षकांचे वेतन १ तारखेला करण्याचे आदेश दिले होते; परंतु राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना कधीच १ तारखेला वेतन अदा करण्यात येत नाही; सण, उत्सवाच्या काळातसुद्धा शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागते. यावरून शासनाचा निर्णय केवळ कागदावरच असल्याचे सिद्ध होते; सण, उत्सवाच्या काळातही शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने, अनेक समस्या निर्माण होतात. पवित्र रमजान महिना व ईद सणापूर्वी शिक्षकांना वेतन अदा करण्याची मागणी अ.भा. उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षण संचालकांकडे करण्यात आली होती. संघटनेच्या मागणीची दखल घेत, शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी, शिक्षकांना वेतन १ जूनपूर्वी देण्याचे निर्देश राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकांना दिले आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title:  Instructions for paying teachers before Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.