लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात;  टोपले, सुप, फळे विकण्याची आली पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 06:37 PM2021-06-09T18:37:03+5:302021-06-09T18:37:25+5:30

Murtijapur News : अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे.

Instrument business in crisis due to lockdown; It was time to sell baskets, soups, fruits | लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात;  टोपले, सुप, फळे विकण्याची आली पाळी

लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात;  टोपले, सुप, फळे विकण्याची आली पाळी

googlenewsNext

- संजय उमक 
मूर्तिजापूर : लॉकडाऊने भल्याभल्यांना वाट दाखवली त्यात मोठ्या व्यवसायापासून ते किरकोळ मंजूरही भरडल्या गेले, अनेकांचा यामुळे रोजगार गेला आहे तर कित्येक जणांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकाळात लग्न समारंभात मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली वाजंत्री व्यवसायाला परवानगी नसल्याने त्यांना सहजच या समारंभातून वगळण्यात आले. अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे.
              कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय संकटात आले आहेत. याचा परिणाम हात मजूरांनाही भोगावा लागला. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने धुमधडाक्यात लग्न करणारांचे मनसूबे पार धुळीस मिळाले आहे. या कालावधीत विवाह समारंभ मोजकेच पार पडत असल्याने, या समारंभात मुख्य भूमिका असलेल्या वाजंत्री वाजविणाऱ्यांचा व्यवसाय सुध्दा ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. हा व्यवसाय महाराष्ट्रात बहूदा विशिष्ट समाजाच्या माध्यमातून चालविला जातो, मातंग जमाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे वाजंत्री वाजविनणे व बांबू आणि शिंदोळी झाडापासू फळे बणविणे यासाठी कुशल हस्त कारागीरीने ते टोपले, सुप, फळे आदी घरगुती कामासाठी लागणाऱ्या विशिष्ट वस्तू बणवतात, परंतू वाजंत्री वाजविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. हाच व्यवसाय गत दीड वर्षभरापासून बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे, बॅंड व्यवसायाचे संचालकही हतबल झाले असून त्यांनाही इतर कामे करावी लागत आहे. काहींनी तर बॅंडसाठी वापरण्यात येत असलेल्या गाडीवरच आपला टोपले, सुप विक्रीचा व्यवसाय थाटला आहे.  बॅंड पार्टीत मजूरी दाखल वाजंत्री वाजविण्याचे काम करीत असणाऱ्या कलाकाराचा हा व्यवसाय बंद पडल्याने अक्षरशः उपासमारीची पाळी आली आहे तर काही इतर किरकोळ मजूरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढून आपली उपजीविका भागवीत आहे. 

 
आमचा वाजंत्री वाजविण्याचा मुख्य व्यवसायच दीड वर्षांपासून बंद आहे, प्रामुख्याने चार महीने चालणाऱ्या व्यवसायावरच आम्हा एक वर्ष कुटुंब चालवावे लागते, एका बॅंड पथकात किमान ३० लोक असतात यावरच यांच्या घरची चुल पेटते, उपासमारीची वेळ आल्याने शासनाने कलांवत म्हणून मदतीचा हात पुढे करावा.
-नरेंद्र आमटे
गाडगेबाबा बॅंड पथक संचालक, मूर्तिजापूर
 
गत दीड वर्षापासून वाजंत्री व्यवसाय बंद असल्याने वाजंत्री कलावंत हा आर्थिक संकटात सापडला आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा जोड धंदा अथवा व्यवसाय नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी.
- प्रकाश आमटे
संचालक, श्याम बॅंड पार्टी, मूर्तिजापूर

Web Title: Instrument business in crisis due to lockdown; It was time to sell baskets, soups, fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.