वाजंत्री व्यवसाय संकटात; पालकमंत्री कडू यांनी जाणून घेतल्या व्यथा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:43+5:302021-06-16T04:26:43+5:30

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायावर गंडांतर आले. त्यातून लग्नसमारंभात वाजंत्री व्यवसाय करणारे कलावंतही सुटले नाहीत. या कलावंतांना आता टोपले, सूप, फळे ...

Instrumental business in crisis; Grief learned by Guardian Minister Kadu! | वाजंत्री व्यवसाय संकटात; पालकमंत्री कडू यांनी जाणून घेतल्या व्यथा!

वाजंत्री व्यवसाय संकटात; पालकमंत्री कडू यांनी जाणून घेतल्या व्यथा!

Next

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायावर गंडांतर आले. त्यातून लग्नसमारंभात वाजंत्री व्यवसाय करणारे कलावंतही सुटले नाहीत. या कलावंतांना आता टोपले, सूप, फळे विकून व किरकोळ मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात लग्नमंडपी वऱ्हाडीमंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने लग्नसमारंभातून ‘बँडबाजा’ बाद झाला आहे. यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पालकमंत्री बच्चू कडू यांनी आवर्जून दखल घेत, टोपले विक्री करण्यास येत असलेले दुकानदार दिनेश गायकवाड यांची भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

पालकमंत्र्यांनी खरेदी केली ‘दवडी’

वाजंत्री व्यवसाय ठप्प झाल्याने वाजंत्री व्यावसायिकांनी टोपले, सूप, फळे, विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला. सोमवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी हा व्यवसाय करणाऱ्यांना भेट दिली. दरम्यान, सहानुभूती म्हणून बच्चू कडू यांनी या दुकानातून एक ‘दवडी’ खरेदी केली. यावेळी अधिकारी, प्रहारसेवक उपस्थित होते.

Web Title: Instrumental business in crisis; Grief learned by Guardian Minister Kadu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.