विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:22+5:302021-05-26T04:19:22+5:30
काही दिवसांपूर्वी मूग व उडदाचा विमा खात्यात जमा झाला आहे. मात्र, सोयाबीन व कपाशीचा विमा कंपनीने नाकारला आहे. ...
काही दिवसांपूर्वी मूग व उडदाचा विमा खात्यात जमा झाला आहे. मात्र, सोयाबीन व कपाशीचा विमा कंपनीने नाकारला आहे. तेल्हारा तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचा एकाच मंडळाचा विमा कंपनीने मंजूर केला आहे. मात्र, सर्वांत जास्त सोयाबीनचे नुकसान बाळापूर तालुक्यात झाले असताना सुद्धा सोयाबीन पिकाचा विमा देण्यात आला नाही. कवठा, बहादुरा, लोहारा, कारंजा, अंदुरा, निंबा आदी परिसरातील शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा आहे. परिसरात एकरी एक ते दोन क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाल्याचा अहवाल तलाठ्याने दिला होता, असे असतानाही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा विमा का नाकारण्यात आला, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने विम्याची रक्कम जमा करावी; अन्यथा परिसरातील शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.