१.६९ लाख हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 10:25 AM2020-08-02T10:25:52+5:302020-08-02T10:26:09+5:30

३ लाख १७ हजार शेतकऱ्यांपैकी २ लाख ४ हजार ५८२ शेतकऱ्यांनी १ लाख ६९ हजार ९२१ हेक्टरवरील खरीप पिकांचा विमा काढला आहे.

Insurance cover for crops on 1.69 lakh hectares! | १.६९ लाख हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच!

१.६९ लाख हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप पिकांचा विमा काढण्याची मुदत ३१ जुलै रोजी रात्री संपली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ३ लाख १७ हजार शेतकऱ्यांपैकी २ लाख ४ हजार ५८२ शेतकऱ्यांनी १ लाख ६९ हजार ९२१ हेक्टरवरील खरीप पिकांचा विमा काढला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू करण्यात आली होती.
पीक विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै रोजी रात्री संपुष्टात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील ३ लाख १७ हजार शेतकºयांपैकी २ लाख ४ हजार ५८२ शेतकºयांनी ३१ जुलैपर्यंत १ लाख ६९ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज सादर केले. त्यामध्ये १ लाख ९२ हजार ७१५ बिगर कर्जदार शेतकºयांनी व ११ हजार ८६७ कर्जदार शेतकºयांनी सोयाबीन, कपाशी , तूर, मूग , उडीद व ज्वारी इत्यादी खरीप पिकांचा विमा काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे कवच मिळाले आहे.


विमा हप्त्यापोटी शेतकºयांकडून १३.९८ कोटी जमा!
जिल्ह्यात खरीप पिकांचा विमा काढलेल्या शेतकºयांकडून पीक विमा हप्त्यापोटी १३ कोटी ९८ लाख ८० हजार ७७७ रुपयांची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करण्यात आली.


असे आहेत पीक!
पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ४ हजार ५८२ शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख ३ हजार १०३ शेतकºयांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. तसेच ३७ हजार शेतकºयांनी तूर, २८ हजार १९३ शेतकºयांनी मूग, ११ हजार ७६१ शेतकºयांनी कपाशी, १८ हजार ३०६ शेतकºयांनी उडीद व ५ हजार ८२२ शेतकºयांनी ज्वारी पिकाचा विमा काढला आहे.


प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी २ लाख ४ हजार ५८२ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले असून, १ लाख ६९ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढण्यात आला आहे.
-मोहन वाघ
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Insurance cover for crops on 1.69 lakh hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.