गहू, हरभरा पिकासाठी विमा योजना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:50 PM2019-12-03T15:50:12+5:302019-12-03T15:51:39+5:30
पीक विमा काढण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तर उन्हाळी पिकांसाठी १ एप्रिल २०२० सहभाग घेता येणार आहे.
अकोला : रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तर उन्हाळी पिकांसाठी १ एप्रिल २०२० सहभाग घेता येणार आहे.
या योजनेत राज्यात सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पीक कर्ज दराप्रमाणे पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.
या योजनेत उंबरठा उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाचे मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न पिकाखालील क्षेत्र आणि चालू हंगामात पुरेसे पीक कापणी प्रयोग घेण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ या बाबी विचारात घेऊन राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने पीकनिहाय विमा क्षेत्र घटक अनुसूचित केलेले आहेत. असे करताना राज्यातील सर्व जिल्ह्यामधील प्रमुख पिके अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. अधिसूचित केलेल्या सर्र्व पिकांसाठी उत्पन्नाचा अंदाज काढण्याचा मानक पद्धतीनुसार आवश्यक तेवढ्या पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना अनिवार्य आहे. गहू, हरभरा व कांदा आदी पिकांसाठी ही योजना लागू आहे. बिगर कर्जदार शेतकºयांनाही ३१ डिसेंबरपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.
जिल्हा समिती
जिल्ह्यात पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी भारत एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे.
पीक विमा हप्ता
या योजनेत वेगवेगळ््या पिकांसाठी शेतकºयांना वेगवेगळी रक्कम भरावी लागणार असून, बागायती गहू पिकाला हेक्टरी ५२५ रुपये, हरभरा पिकासाठी ३६० रुपये, भुईमुगासाठी हेक्टरी ५७० रुपये तर रब्बी कांद्यासाठी ३,६५० रुपये भरावे लागणार आहेत.
कांदा पिकासाठी या तालुक्याचा समावेश
कांदा पिकासाठी अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व बार्शीटाकळी तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, भुईमुगासाठी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बार्शीटकाळी तालुक्यांचा समावेश आहे.
रब्बी हंगामासाठी यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, अधिसूचित केलेले तालुके व पिकांसाठी या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत शेतकºयांना विमा प्रस्ताव सादर करता येणार आहे.
मोहन वाघ ,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.