तीन लाख शेतकऱ्यांना देणार विम्याचे ‘कवच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:49 PM2018-05-18T15:49:09+5:302018-05-18T15:49:09+5:30
अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली.
अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत पात्र गरीब,गरजू व वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. वार्षिक १२ रुपये हप्ता (प्रीमियम )असलेल्या मिशन पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात सन २०१८-१९ या वर्षात अकोला जिल्ह्यातील ३ लाख १६ खातेदार शेतकºयांना विमा योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १८ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्यात येणार आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या नावे प्रत्येकी २२० रुपये मुदत ठेव (एफडी) संबंधित बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत शेतकºयांचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना गाव व बँकनिहाय अर्ज देण्यात येणार असून, संबंधित कर्मचारी विमा काढणाºया शेतकºयांचे अर्ज भरुन घेतील. १८ ते ७० वर्षे वयोगटातील शेतकरी या विमा योजनेत सहभागी होऊ शकतील. जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्याच्या या योजनेत शेतकºयांच्या विमा हप्त्याची (प्रीमियम )रक्कम भरण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपनिबंधक जी.जी.मावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते उपस्थित होते.
आठ कोटींचा निधी खर्च करणार!
मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व खातेदार ३ लाख १६ हजार शेतकºयांचा विमा काढण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत आठ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार, तसेच शेतकºयांचा विमा काढण्याच्या कामात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
विमा काढलेल्या शेतकºयांना असा मिळणार लाभ!
मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा काढलेल्या शेतकरी कुटुंबांना अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे अंशत: अपंगत्व आल्यास एक लाख आणि पूर्णत: अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये असा लाभ मिळणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.