मध्यवर्ती बस स्थानकावर रात्री प्रवाशांची घालमेल

By admin | Published: May 26, 2014 09:28 PM2014-05-26T21:28:16+5:302014-05-27T19:30:16+5:30

अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीच्या वेळेस प्रवाशांची घालमेल असल्याचे दिसून येते.

Integration of the night passengers at the central bus station | मध्यवर्ती बस स्थानकावर रात्री प्रवाशांची घालमेल

मध्यवर्ती बस स्थानकावर रात्री प्रवाशांची घालमेल

Next

अकोला : उन्हाळ्याची सुटी आणि लग्नसराईमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना फार गर्दी वाढली आहे. अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीच्या वेळेसदेखील हीच स्थिती कायम असल्याचे दिसून येते. रात्री १0 नंतर प्रवास करणार्‍या नागरिकांना अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर गाड्यांबाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने त्यांची घालमेल होत असल्याचे दिसून येते.
सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असून, पालक वर्ग व बच्चे कंपन्यांनी मिळून नियोजित स्थळी जाण्यासाठी प्रवासाला निघत आहेत. त्यातच मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असल्याने लग्न कार्य अटेंड करण्याची एक वेगळीच घाई बस स्थानकावर दिसून येते. भर दिवसा उन्हाचा तडाखा सहन करण्याऐवजी अनेक जण रात्रीचा प्रवास करणे पसंत करीत असल्याने अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीसुद्धा प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे. रात्री १0 नंतर येणार्‍या जाणार्‍या गाड्यांची उद्घोषणा होत नसल्याने अक्षरश: फलाटांवर उभे असलेले प्रवासी स्थानकात प्रवेश करणारी गाडी कोणती, हे पाहण्यासाठी तिच्या दिशेने तुटून पडतात. बाहेरगावाहून अकोला मार्गे जाणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्यास, त्याबाबत अलीकडच्या बस स्थानकावर चौकशी करण्याऐवजी त्या किती वाजता अकोला बस स्थानकावर आल्या आणि गेल्या केवळ एवढ्यापुरतेच काम येथील रात्रपाळीचे अधिकारी करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. नादुरुस्त झालेल्या एखाद्या लांब पल्ल्याच्या गाडीला पर्याय म्हणून एकही शिल्लक गाडी अकोला विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांना सुविधा देण्यास एसटी महामंडळ असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)

** चौकशी अधिकर्‍यांशी वाद
अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर रात्री येणार्‍या बहुतांश गाड्या चालकांकरवी फलाटांवर लावण्याऐवजी इतरत्र लावल्या जातात. यामुळे बरेचदा फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना आलेली बस कोणती, हे अखेरपर्यंत कळत नाही. अशा वेळी गाडी चुकल्याने चौकशी अधिकार्‍याशी वाद घालण्यापलीकडे प्रवाशांसमोर दुसरा पर्याय उरत नाही.

**  सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी
मध्यवर्ती बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमार्फत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतात. दिवसा चार पुरुष व दोन महिला, तर रात्रीच्या वेळेसे दोनच पुरुष सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. सुरक्षा चोख ठेवण्यासाठी ही संख्या कमी असल्याने गर्दीच्या काळात पाकीटमारांचे फावते.

Web Title: Integration of the night passengers at the central bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.