आंतरधर्मीय विवाहाचा प्रयत्न फसला
By admin | Published: August 5, 2016 01:34 AM2016-08-05T01:34:20+5:302016-08-05T01:34:20+5:30
विवाहाच्या मुद्यावरून दोन विधिज्ञांमध्ये वाद.
अकोला: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगरात राहणार्या एका प्रेमी युगुलाचा आंतरधर्मीय विवाह करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी फसला. या विषयावरून न्यायालयातील दोन विधिज्ञांमध्ये वाद झाला.
उत्तर प्रदेशातील राहणार्या प्रेमी युगुलाने काही दिवसांपूर्वी मुंबई येथे आंतरधर्मीय विवाह केला. विवाह केल्याबद्दल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोघेही गुरुवारी दुपारी न्यायालयात आले. कायदेशीर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असतानाच दोन विधिज्ञांमध्ये वाद सुरू झाला. दोघांमधील वाद रामदासपेठ पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी प्रेमी युगुलाला ताब्यात घेतले.
युवक व युवती उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगरात राहतात. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याने, दोघांनी मुंबई येथे लग्न केले. वर्षभरापासून युवक अकोल्यात राहत असल्याने तो युवतीला अकोल्यात घेऊन आला. विवाह केल्यानंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोघे गुरुवारी न्यायालयात आले. आंतरधर्मीय विवाहाचे प्रकरण असल्याने न्यायालयातच दोन विधिज्ञांमध्ये वाद झाला. वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी युवक व युवतीला ताब्यात घेऊन सिद्धार्थ नगर पोलिसांनी कळविले. यावेळी सिद्धार्थ नगर पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल असल्याची बाब समोर आली. रामदासपेठ पोलिसांच्या माहितीनुसार प्रेमी युगुलाचा विवाह झालेला नसल्यामुळे युवक व युवतीला उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.