आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा; पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती विद्यापीठांची आघाडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:00 PM2018-12-01T13:00:28+5:302018-12-01T13:00:39+5:30
मुंबई विद्यापीठाने सिम्बॉयसिस विद्यापीठाला ४-० ने हरवित तर अमरावती विद्यापीठाने औरंगाबाद विद्यापीठाला ४-० ने मात देत आघाडी घेतली.
अकोला: पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीअखेर, पुरुष गटात, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने इंदूर विद्यापीठाला ४-० ने नमवित, मुंबई विद्यापीठाने सिम्बॉयसिस विद्यापीठाला ४-० ने हरवित तर अमरावती विद्यापीठाने औरंगाबाद विद्यापीठाला ४-० ने मात देत आघाडी घेतली.
महिला गटात मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर) यांनी भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ, दापोली विद्यापीठ, पाटण विद्यापीठ व जी.टी.यू. विद्यापीठ गुजरात यांचा सहज पराभव केला.
अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा पहिल्या पटावर पुणे विद्यापीठाची अतिशय तुल्यबळ लढत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी चालू होती. दुसºया पटावर मुंबईची लढत जबलपूर विद्यापीठाशी रोमहर्षक स्थितीत चालू होती. पुरुष गटात तिसºया फेरीत एकूण दहा विद्यापीठे संयुक्तपणे आघाडीवर असून, महिला गटात नऊ विद्यापीठे ४ गुणांसह आघाडीवर आहेत. या स्पर्धेत फिडे मान्यताप्राप्त प्रवीण ठाकरे प्रमुख पंच असून, स्पर्धेची तांत्रिक मदतीसाठी फिडे पंच अमरीश जोशी, फिडे पंच मंगेश गंभीरे, राष्ट्रीय पंच यशवंत बापट, अंकुश रक्ताले, विकास भावे, आदित्य निचत, सुमित ठाकरे काम पाहत आहेत.
तिसºया फेरीअखेर, महिला गटात अपेक्षेप्रमाणे मुंबई विद्यापीठाने सहजरीत्या विजय संपादन केला, तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने राजस्थान विद्यापीठावर तर शिवाजी विद्यापीठाने (कोल्हापूर), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर मात करीत आघाडी घेतली.
पुरुष गटात पुणे विद्यापीठाने तुल्यबळ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३.५- ०.५ तर मुंबईने जबलपूर विद्यापीठाचा ३-१ ने पराभव केला. राजस्थानने अमरावती विद्यापीठाला आश्चर्यकारकरीत्या बरोबरीत रोखले.