भाजपा सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:54 PM2017-10-25T18:54:12+5:302017-10-25T19:30:00+5:30

भाजपा सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला.

The interest of the BJP government! | भाजपा सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे!

भाजपा सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे!

Next
ठळक मुद्देगुलाबराव गावंडे यांचा आरोप ३१ आॅक्टोबरपासून शेतकºयांच्या प्रश्नावर बेमुदत धरणे आंदोलन

अकोला : राज्य व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी हिताचे नसून केवळ व्यापाºयांच्या हिताचे आहे. अपुरा पाऊस व उत्पादनात घट असतानाही सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या वाणाचे भाव या सरकारने पाडले, कापूस खरेदीला आॅनलाइन करून शेतकºयांची अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला. शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी आता राष्टÑवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असून, येत्या ३१ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करीत असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेला माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्टÑवादीचे महानगर अध्यक्ष राजू मुलचंदाणी, अनिल मालगे आदी उपस्थित होते. गावंडे यांनी शेतकºयांच्या प्रश्नांकडे होणाºया सरकारच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त केला. शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याऐवजी हे सरकार कोंडी निर्माण करीत आहे. तूर, उडीद, मुगाच्या खरेदीत हाच प्रकार अनुभवला व आता सोयाबीनच्या भावातही मोठी घसरण सुरू झाली आहे. सोयाबीनला प्रती एकर ६ हजार भाव देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकºयांची होणारी ससेहोलपट थांबावी, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्टÑवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामधील पहिला टप्पा म्हणून येत्या ३१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी सहभागी होणार असून, हे आंदोलन बेमुदत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अवैध सावकारी विरोधातही रणशिंग
अवैध सावकारी पुन्हा एकदा डोके वर काढत असून, मोठ-मोठी नावे समोर येत आहेत. या सावकाराच्या जाचातून सामान्य शेतकºयाची सोडवणूक करण्यासाठीही याच आंदोलनातून रणशिंग फुंकले जाणार असल्याचे गुलाबराव गावंडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: The interest of the BJP government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.