गोयनका, रुंगटा यांना अंतरिम जामीन
By admin | Published: July 31, 2015 01:59 AM2015-07-31T01:59:54+5:302015-07-31T01:59:54+5:30
युवकाच्या लैंगिक शोषणप्रकरणातील आरोपींस अंतरिम जामिन.
Next
अकोला: रादेगो महिला महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहामध्ये देखभाल व बगिच्याचे काम करणार्या युवकाच्या लैंगिक शोषणप्रकरणी भारतीय सेवा सदनचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका व माजी सचिव जुगलकिशोर रुंगटा यांच्या अंतरिम जामिनावर गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती जे.बी. वैराळे यांच्या न्यायालयाने दुसर्यांदा अंतरिम जामीन मंजूर केला. आरोपींच्या कायम जामिनावर आता ५ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांच्याविरुद्ध ८ जुलै रोजी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.