पशुवैद्यकीय संस्थेत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण; १२ देशातील प्रतिनिधींचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:44+5:302020-12-07T04:13:44+5:30

सदर प्रशिक्षणाचे उदघाटन जागतीक ब्युँट्रिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ अर्कागेंलो जन्टील, बॉलोग्ना विद्यापीठ यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सहयोगी ...

International training in veterinary institutes; Participation of representatives from 12 countries | पशुवैद्यकीय संस्थेत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण; १२ देशातील प्रतिनिधींचा सहभाग

पशुवैद्यकीय संस्थेत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण; १२ देशातील प्रतिनिधींचा सहभाग

Next

सदर प्रशिक्षणाचे उदघाटन जागतीक ब्युँट्रिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ अर्कागेंलो जन्टील, बॉलोग्ना विद्यापीठ यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने हे अध्यक्षस्थानी होते. प्रशिक्षण समन्वयक प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांनी प्रशिक्षणाचे प्रास्ताविक केले.

याप्रसंगी प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचनदेखील करण्यात आले. सात दिवसांच्या प्रशिक्षणात एकूण २९५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून यात भारतातील सर्व राज्यातील तसेच जर्मनी, मलेशिया, बांगलादेश, इटली, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, सोमालिया, फिलिपाइन्स, केनिया, युनायटेड अरब अमिरात इत्यादी विविध देशातील प्रतिनिधी सहभागी झाले. सदर प्रशिक्षणात प्रा. अर्कान्गेलो जन्टील (इटली), डॉ. फ्रान्सिस्को टेस्टा (इटली), डॉ. ऋतुराज पाटील (जर्मनी) यांच्यासह भारतातील नामांकित पशुवैद्यकीय संस्थेचे प्रा. डॉ. एन. के. सूद, प्रा. डॉ. स्वर्णसिंग रधांवा, डॉ. धीरज गुप्ता (पंजाब), प्रा डॉ विजयकुमार, डॉ शिवरामन, डॉ. असोक कुमार (तामिळनाडू), डॉ. डी. एस. मिना (राजस्थान) प्रा.डॉ. एस. के. रावल (गुजरात), प्रा. डॉ. विवेक कासराळीकर (कर्नाटक) डॉ. अशोक कुमार (तेलंगणा) डॉ. विकास चत्तर (महाराष्ट्र) सह संस्थेचे प्रा.डॉ अनिल भिकाने अशा १५ नामवंत व्याख्यात्यानी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

समारोपप्रसंगी प्रा. डॉ. ए. पी. सोमकुंवर, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता मपमविवि नागपूर यांच्या हस्ते डॉ. धनजंय दिघे, सहयोगी अधिष्ठाता, शिरवळ, प्रा. डॉ. विवेक कसराळीकर, बिदर व श्री. पी. करुणानिधी उपाध्यक्ष अँलेम्बीक फार्मा लि. यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

डॉ. किशोर पजई, प्रशिक्षण सह समन्वयक यांनी सूत्रसंचालन तर डॉ. बालाजी अंबोरे यानी आभार मानले. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनात डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. बालाजी अंबोरे, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. प्रवीण बनकर, डॉ. संतोष शिंदे यांनी सह समन्वयक म्हणून परिश्रम घेतले.

Web Title: International training in veterinary institutes; Participation of representatives from 12 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.