International Yoga Day 2019 : आरोग्य निरोगी राखण्यासाठी योगा आवश्यक  - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:58 PM2019-06-21T12:58:46+5:302019-06-21T13:00:22+5:30

अकोला: आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी तसेच शरीर सुदृड राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योगासनाचा समावेश आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

International Yoga Day 2019: Yoga Required to Keep Healthy - District Collector Jitendra Papalkar | International Yoga Day 2019 : आरोग्य निरोगी राखण्यासाठी योगा आवश्यक  - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

International Yoga Day 2019 : आरोग्य निरोगी राखण्यासाठी योगा आवश्यक  - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next

अकोला: आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी तसेच शरीर सुदृड राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योगासनाचा समावेश आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. आज संपुर्ण जगात 21 जुन हा पाचवा आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्त डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दिक्षांत समारंभ सभागृहात 21 जुन 2019 रोजी सकाळी 7 वाजता आयोजीत योग शिबीरात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महापौर विजय अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव , शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद , प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठक, औद्योगीक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. भंडारे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन योग शिबीराची सुरवात करण्यात आली, शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या योग शिक्षकांनी योगाचे धडे ‍दिले. या वेळी ताडासन, वृक्षासन, हस्तपादासन , पद्मासन, वक्रासन, हलासन, चक्रासन, भुजंगासन आदि प्रकारच्या आसनासह कपाल भारती, अनुलोम-विलोम,भ्रांमरी,उदगी, यासारखे विविध प्राणायामचे प्रकार तसेच हात ,मान, व पायाचे व्यायाम शिकविण्यात आले या वेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या अबालवृध्दांनी अत्यंत लयबध्द व शिस्तबध्द पध्दतीने योगासने केलीत. कार्यक्रमाचे संचलन ॲड. सुहास काटे यांनी केले. उपस्थ‍ितांचे आभार जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी मानले.

योग शिबीर यशस्वी करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , नेहरु युवा केंद्र , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, राष्ट्रीय सेवा योजना , एन.सी.सी., अकोला जिल्हा युवक फोरम, पतंजली योग समिती ,अजिंक्य साहसी ग्रृपचे धनंजय भगतसह विविध सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले.

या शिबीरामध्ये शासकीय , निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शाळा, महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी ,पंतजली योग समिती ,पोलीस प्रशिक्षण केंद्र ,एनसीसी व एनएसएस , स्काऊट गाईड, योग भारती, क्रिडा भारती, किसान भारती, इंडियन मेडिकल असोशिएशन , योग परिषद , अंजिक्य फिटनेस पार्क , योगासन व सांस्कृतिक मंडळ, योग विदयाधाम, योगासन सेवा समिती , आरोग्य भारती, ब्रम्हकुमारी विश्वविदयालय , स्वयंसिध्दा प्रशिक्षण केंद्र , संत निरंकारी मंडळ, प्रताप्रती गृप, गायत्री गृप, आर्य समाज मंडळ आदींसह शेकडो योगप्रेमी सहभागी झाले होते.

Web Title: International Yoga Day 2019: Yoga Required to Keep Healthy - District Collector Jitendra Papalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.