अकोल्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
By रवी दामोदर | Published: June 21, 2024 05:27 PM2024-06-21T17:27:25+5:302024-06-21T17:28:02+5:30
यावेळी डॉ. सुहास काटे यांनी योगसनाचे प्रात्यक्षिके दाखविली. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या राजयोगीनी रुक्मीनी दिदी यांच्याद्वारे ज्ञानधारणा करण्यात आली.
अकोला : जिल्ह्यात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात दि.२१ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, संदीप हाडोळे यांच्यासह पंतजली योग समिती, प्रजापिता ब्रम्हकुमारी, क्रीडा भारतीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुहास काटे यांनी योगसनाचे प्रात्यक्षिके दाखविली. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या राजयोगीनी रुक्मीनी दिदी यांच्याद्वारे ज्ञानधारणा करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पदाधिकारी, नेहरु युवा केंद्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र चे महिला प्रशिक्षणार्थी, पंतजली योग समिती, योग भारती, क्रीडा भारती, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, योग परिषद, योगासन व सांस्कृतीक मंडळ, प्रजापिता ब्रम्हकुमारी, संत निरंकारी मंडळ, गायत्री ग्रुप, सिंधू सिनिअर सिटीजन असोसिएशन, मॉर्निंग योगा ग्रुप चे सदस्य, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
२००० योगप्रेमींचा सहभाग
जिल्ह्यात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे कार्यक्रमात अंदाजे २००० योगप्रेमी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार किशोर बिडवे यांनी मानले. या कार्यक्रमाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे, राजू उगवेकर, निशांत वानखडे, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे, अनुप वर्मा, राहूल तारापुरे, रसिका मेहेसरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.