आंतरवासिता डॉक्टरांचा संप सुरुच; कँडल मार्च काढून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:59 PM2018-06-17T15:59:18+5:302018-06-17T15:59:18+5:30

अकोला : विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बुधवार, १३ जूनपासून बेमुदत संपावर गेलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन रविवारी पाचव्या दिवशीही सुरुच होते.

interns doctors strike in gmc akola | आंतरवासिता डॉक्टरांचा संप सुरुच; कँडल मार्च काढून केला निषेध

आंतरवासिता डॉक्टरांचा संप सुरुच; कँडल मार्च काढून केला निषेध

Next
ठळक मुद्देयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ८१ आंतरवासिता डॉक्टर (इंटर्न) सहभागी झाले आहेत. संपात सहभागी आंतरवासीता डॉक्टरांनी शनिवारी रात्री कँडल मार्च काढून शासनाकडून विद्यावेतनात वाढ करण्यात होत असलेल्या दिरंगाईचा निषेध केला.११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे.

अकोला : विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बुधवार, १३ जूनपासून बेमुदत संपावर गेलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन रविवारी पाचव्या दिवशीही सुरुच होते. असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी) या संघटनेने पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ८१ आंतरवासिता डॉक्टर (इंटर्न) सहभागी झाले आहेत. संपात सहभागी आंतरवासीता डॉक्टरांनी शनिवारी रात्री कँडल मार्च काढून शासनाकडून विद्यावेतनात वाढ करण्यात होत असलेल्या दिरंगाईचा निषेध केला.
राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते; मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून काम थांबविले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत संप करण्यावर ते ठाम आहेत. संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत व तसा लेखी आदेश हाती येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती असोसीएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न (अस्मी) चे जिÞल्हा प्रतिनिधी डॉ.अंकित तायडे व सदस्य डॉ.मुजाम्मिल सैयद,डॉ.प्रशांत वान्देशकर.डॉ दीपंकर यादव, डॉ.शुभम वायल,डॉ.पालेकर, डॉ. दातकर यांनी सांगितले.

Web Title: interns doctors strike in gmc akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.